आयपीएलमध्ये सीएसकेचे ‘हे’ 3 खेळाडू माजवणार धुमाकूळ; 14.3 कोटींचा अष्टपैलू खेळाडू ठरणार गेम चेंजर!

पाच वेळची चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स IPL 2026 मधील आपला पहिला सामना ३० मार्च रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळणार आहे. CSK ने शेवटचे जेतेपद २०२३ मध्ये पटकावले होते, परंतु त्यानंतरच्या दोन्ही हंगामात त्यांना प्लेऑफसाठी पात्र ठरता आले नाही. मात्र, २०२६ मध्ये चेन्नईकडे असा संघ आहे, जो त्यांना सहावे जेतेपद मिळवून देण्याची ताकद राखतो. येथे आपण अशा ३ खेळाडूंवर नजर टाकूया, जे या वेळी चेन्नई सुपर किंग्सला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवू शकतात.

​सर्वात पहिले आणि मोठे नाव म्हणजे संजू सॅमसनजो राजस्थान रॉयल्समधून आता CSK मध्ये सामील झाला आहे. सॅमसन सध्या इतक्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे की, टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये त्याने टीम इंडियासाठी सलग ३ अर्धशतकी खेळी केल्या आहेत. त्याने वर्ल्ड कपमध्ये ३२१ धावा फटकावल्या आणि भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. या वेळी सर्वांच्या नजरा त्याच्यावर असतील, कारण तो चेन्नई सुपर किंग्ससाठी आपले पदार्पण करणार आहे.

​१९ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज कार्तिक शर्माला चेन्नई सुपर किंग्सने मिनी ऑक्शनमध्ये १४.२० कोटी रुपयांना खरेदी केले होते. लिलावानंतर CSK चे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग म्हणाले होते की, त्यांची नजर बऱ्याच काळापासून कार्तिकवर होती आणि त्यांनी योग्य वेळी त्याच्यावर मोठी बोली लावली आहे. एमएस धोनीची निवृत्ती आता फार दूर वाटत नसल्याने, भविष्यात कार्तिकला संजू सॅमसनचा बॅकअप यष्टीरक्षक म्हणून तयार केले जाण्याची शक्यता आहे.

20 वर्षांचा प्रशांत वीरवार देखील चेन्नई सुपर किंग्सने १४.२ कोटी रुपयांची मोठी बोली लावली होती. प्रशांत CSK साठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण रवींद्र जडेजाच्या जाण्यानंतर तो संघात डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज आणि अष्टपैलू (All-rounder) खेळाडूची भूमिका बजावू शकतो. त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेशसाठी खेळताना ७ सामन्यांत ९ बळी घेतले होते. मात्र, त्याने सर्वाधिक प्रभावित केले ते म्हणजे त्याच्या ६.७६ च्या इकॉनॉमी रेटमुळे.

Comments are closed.