अजित पवारांवर देवेंद्र फडणवीस : हत्येचा संशय असेल तर स्वर्ग-नरक एक करा, चिखल काढा,
अजित पवारांवर देवेंद्र फडणवीस : हत्येचा संशय असेल तर स्वर्ग-नरक एक करा, चिखल काढा,
विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आमदार रोहित पवार यांनी सभागृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या चौकशीबद्दल प्रश्न उपस्थित केले. अपघात की घातपात यासंदर्भात सुरू असलेल्या चौकशीबाबत सरकार का बोलत नाही, सद्यस्थिती काय आहे. तसेच, महाराष्ट्र सरकारने एफआयआर घेतला नाही, पण कर्नाटक सरकारने गुन्हा दाखल करुन घेतला असेही रोहित पवार यांनी सभागृहात बोलताना आवर्जून सांगितले. त्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात भूमिका मांडली असून रोहित पवारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच, अजित दादांचा घातपात असेल तर कोणाचाही बाप असू दे, मुर्दा खोदून काढू असेही ठणकावून सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अंतिम आठवडा प्रस्तावार उत्तर देताना अगोदर अशोक खरात प्रकरणावर भाष्य केलं. याप्रकरणी, कडक कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले. त्यानंतर, आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या अजित पवारांच्या विमान दुर्घटनेवरही फडणवीसांनी सविस्तर उत्तर दिले. डीजीसीए अहवाल आणि आजपर्यंतच्या तपासाची माहिती दिले. तसेच, अजित दादांचा अपघात हा जर घातपात असेल तर कोणाचाही बाप असू दे, खोदून काढू, सोडणार नाही. कदाचित तुमच्यापेक्षा माझी तीव्रता कमी असू शकते, पण इतकी बोथट नाही की अजित दादांच्या केसमध्ये कोणी कॉन्स्परिन्सी करेल, तर आम्ही द्याला सोडून देऊ, त्याचा मुदडाही खोदून काढू अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी रोहित पवारांच्या प्रश्नांवर उत्तर देत याप्रकरणी टोकाच तपास करण्याचे ठणकावले.
Comments are closed.