Sunil Tatkare PC: जय,पार्थ आणि सुनेत्रा वहिनी यांच्याबद्दल कटकारस्थान सुरू, तटकरे यांचा खळबळजनक आरोप

Sunil Tatkare PC: जय,पार्थ आणि सुनेत्रा वहिनी यांच्याबद्दल कटकारस्थान सुरू, तटकरे यांचा खळबळजनक आरोप

रोहित पवारांनी आधी त्यांच्या पक्षात काय सुरू आहे हे पाहावं, त्यांनी अजितदादा आणि सुनेत्रा वहिनींच्या विरोधात काय काय कारस्थान केली हे आमच्या सहकाऱ्यांना माहिती आहे. उगाच आम्हाला बोलायला लावू नका असा इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुनील तटकरे  यांनी दिला. रोहित पवारांनी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यावर आरोप केले होते. त्यावर तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलं.सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी राष्ट्रवादीचा ताबा घ्यायचा होता असा आरोप रोहित पवारांनी केला होता. त्यावर सुनील तटकरेंनी रोहित पवारांना प्रत्युत्तर देत इशारा दिला आहे. रोहित पवारांना पक्ष ताब्यात घेण्यासाठी घाई झाली होती असा आरोप सुनील तटकरे यांनी केला. ते म्हणाले की, “रोहित पवारांचे प्रत्येक दिवस प्रसिद्धीसाठी काही ना काही सुरू असतं. जयंत पाटील 40 वर्षे राजकारणात आहेत. त्यांच्या हकालपट्टीची मागणी शिर्डीच्या अधिवेशनात केली होती. त्यांनी आता आमच्या पक्षाबद्दल बोलणं थांबवावं, त्यांच्या पक्षात काय सुरू आहे ते पाहावं.”दादांच्या विरोधात जे कटकारस्थानं झाली तीच कारस्थानं आता सुनेत्रा वहिनी, पार्थ आणि जय पवार यांच्याविरोधात केली जात आहेत. पण ती जनतेने हाणून पाडल्याने रोहित पवरा अस्वस्थ होत आहेत, असा आरोप सुनील तटकरेंनी केला.

Comments are closed.