खोपोलीत सहलीच्या बसची ट्रकला धडक; दहा जखमी, 30 विद्यार्थी बालबाल बचावले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

काळ आला होता, पण वेळ नाही.याचा प्रत्यय आज सकाळी पुण्याहून खोपोलीला सहलीला जाणाऱ्या 30 विद्यार्थ्यांना आला. मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील एक्झिट मिल ठाकूरवाडीजवळील तीव्र उतारावर खासगी बसचे ब्रेक फेल झाले आणि ही बस पुढे असलेल्या ट्रकवर जाऊन धडकली. या अपघातात 10 जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने 30 विद्यार्थी बालबाल बचावले.

पुण्याच्या कोरेगाव जे.एन.पेटीट टेक्निकल हायस्कूलमधील लेझीम पथकातील 30 विद्यार्थ्यांची सहल खासगी बसने खोपोलीतील इमॅजिका वॉटर पार्क येथे निघाली होती. सकाळी 10.30 च्या सुमारास एक्झिट मिल ठाकूरकाडीजवळील उतारावरून उतरत असताना गाडीचे ब्रेक फेल झाले आणि ही बस समोरील ट्रकवर धडकली. सुदैवाने बसमधील 30 विद्यार्थी बालबाल बचावले. हे सर्व विद्यार्थी ‘चंचल ढोल’ पथकाचे कलाकार आहेत. या अपघातात 10 जण किरकोळ जखमी झाले असून यात पाच अल्पवयीन मुली-मुलांचा समावेश आहे.

Comments are closed.