५५ लाखांचे बक्षीस असलेला नक्षलवादी 'सुकरू' आत्मसमर्पण करतो

कमांडर पापा राव याच्यासह  इतर 22 नक्षलींचेही आत्मसमर्पण

वृत्तसंस्था/ रायपूर, भुवनेश्वर

ओडिशाच्या कंधमाल जिह्यात 55 लाख रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी सुक्रू चार साथीदारांसह पोलिसांसमोर शरण आला. तसेच छत्तीसगडमधील एक वरिष्ठ नक्षलवादी कमांडर पापा राव त्याच्या 17 साथीदारांसह सुरक्षा दलांसमोर शरण आला. डाव्या विचारसरणीच्या अतिरेकीपणाविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात हे एक मोठे यश मानले जात आहे. संयुक्त सुरक्षा दलांच्या तीव्र नक्षलविरोधी कारवाया आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे नक्षली गटांवर दबाव आल्यामुळे त्यांनी आत्मसमर्पण केले.

नक्षलवादी सुक्रू राज्य समितीचा सदस्य होता. त्याने एके-47 रायफलसह आपल्याकडील सर्व शस्त्रs जमा केल्याचे डीजीपी वाय. बी. खुरानिया यांनी सांगितले. सुक्रू हा राज्यात सक्रिय असलेल्या शेवटच्या प्रमुख नक्षलवादी नेत्यांपैकी एक मानला जात होता. तर, पापा राव हा दंडकारण्य विशेष विभागीय समितीचे सदस्य आणि दक्षिण उप-विभागीय ब्युरोचा प्रभारी होता असे बस्तर रेंजचे आयजी सुंदरराज पी. यांनी सांगितले.

शरण आलेल्यांमध्ये सात महिला नक्षलवादींचाही समावेश होता. त्या सर्वांनी हिंसाचाराचा त्याग करून मुख्य प्रवाहात परतण्याची इच्छा व्यक्त करत आपली शस्त्रs जमा केली. हे आत्मसमर्पण दंडकारण्य क्षेत्रातील नक्षलवादी संघटनेसाठी एक मोठा धक्का मानल्याचे जात आहे. यातून नक्षली संघटनांचे नेतृत्व कमकुवत होत असल्याचे दर्शवते.

Comments are closed.