वनप्लस इंडियाच्या सीईओंचा तडकाफडकी राजीनामा
वनप्लस इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रॉबिन लियू यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. वनप्लस 7 एप्रिलला आपला नवीन स्मार्टफोन वनप्लस नॉर्ड 6 लाँच करणार आहे. त्याआधीच सीईओने राजीनामा दिला आहे. तीन महिन्यांपूर्वी बातमी समोर आली होती की, कंपनी पश्चिम मार्केट्समधून आपला बाजार बंद करू शकते. त्यावेळी रॉबिन लियू यांनी ही शक्यता फेटाळून लावली होती. ही बातमी चुकीची आहे, असे सांगत कंपनीने बाजारावर फोकस केला आहे, असे त्यांनी म्हटले होते, परंतु आता त्यांच्या राजीनाम्यामुळे कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वनप्लस कंपनी अनेक देशांतून आपला गाशा गुंडाळणार असल्याचे बोलले जात आहे.
Comments are closed.