मुंबईत 40 जणांचे इच्छामरणासाठी पालिकेकडे अर्ज, मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे अर्ज स्वीकारण्याची जबाबदारी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

13 वर्षांपासून कोमात असलेल्या 32 वर्षीय हरीश राणा यांना इच्छामरण देण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर मुंबईतही 40 जणांना इच्छामरण हवे असल्याची माहिती उघडकीस आली आहे. मुंबई महापालिकेकडे 40 जणांचे इच्छामरणासाठी अर्ज आले असून यासंदर्भात कोणतीही सुस्पष्टता नसल्याने या अर्जांचे पुढे काय करायचे, असा पेच निर्माण झाला आहे.

हरीश राणाच्या पहिल्या इच्छामृत्यूनंतर मुंबईतही इच्छामृत्यूसाठी आग्रही असलेल्यांची मोठी संख्या समोर आली आहे. मुंबई महापालिकेने विविध प्रभागांतील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे इच्छामरणासंदर्भात अर्ज स्वीकारण्याची जबाबदारी दिली असून 40 जणांनी पालिकेकडे अर्ज सादर केले आहेत. मात्र यासंदर्भात कोणतीही सुस्पष्टता नसल्याने या अर्जांचे पुढे काय करायचे, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. अशा अर्जांची डिजिटल नोंद करण्यासाठी सरकारच्या शहरी विकास विभागाने पोर्टल तयार केले आहे, मात्र अद्याप महापालिका स्तरावर त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे ही प्रक्रिया रखडण्याची चिन्हे आहेत.

Comments are closed.