14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने संपवले ‘या’ खेळाडूचे आयपीएल करिअर; आता कोणतीही टीम देत नाहीये संधी

१४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२५ दरम्यान आपले पदार्पण (Debu) केले होते, जिथे त्याने अप्रतिम कामगिरी केली. विशेषतः गुजरात टायटन्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने तुफानी शतक ठोकून सर्व संघांना इशारा दिला होता. याच सामन्यात सूर्यवंशीने गुजरातच्या एका स्टार खेळाडूचे आयपीएल करिअरच संपवून टाकले. त्या सामन्यानंतर या खेळाडूला कोणतीही टीम खेळण्याची संधी देखील देत नाहीये.

​राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात हा सामना झाला होता. तिथे गुजरातचा कर्णधार शुभमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा यांनी अफगाणिस्तानचा ऑलराउंडर करीम जानत याला पदार्पण करण्याची संधी दिली. याच सामन्यात राजस्थान रॉयल्सचा उगवता तारा वैभव सूर्यवंशीने अवघ्या ३५ चेंडूंमध्ये शतक झळकावले. त्याने करीम जनतच्या एकाच ओव्हरमध्ये ३० धावा कुटल्या, ज्यामध्ये ३ उत्तुंग षटकार आणि ३ चौकारांचा समावेश होता. ही ओव्हर आता जनतची पाठ सोडायला तयार नाही. गुजरातच्या संघाने या सामन्यानंतर करीम-ला पुन्हा संधी दिली नाही. आयपीएल २०२६ च्या मिनी ऑक्शनमध्येही करीमवर कोणीही बोली लावली नाही. अशा परिस्थितीत काही तज्ञांचे असे मानणे आहे की, त्याचे आयपीएल करिअर आता संपले आहे.

​ऑलराउंडर करीम जनतने आंतरराष्ट्रीय स्तरावर अफगाणिस्तानसाठी २ कसोटी आणि ३ वनडे सोबतच ७५ टी-२० सामने खेळले आहेत. मात्र, सध्या करीम जनतला संघात स्थान मिळवता येत नाहीये. दुसरीकडे वैभव सूर्यवंशीबद्दल बोलायचे झाले तर, या सामन्यानंतर त्याचे नशीबच पालटले आहे. आता आयपीएल २०२६ मध्ये जर त्याने राजस्थान रॉयल्ससाठी अशीच चमकदार कामगिरी केली, तर त्याला लवकरच टीम इंडियासाठी खेळण्याची संधी देखील मिळू शकते.

Comments are closed.