IPL 2026 च्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर; 3 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वानखेडेवर ‘हे’ दोन संघ आमनेसामने येणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गुरुवारी टाटा इंडियन प्रीमियर लीग 2026 च्या दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर केले आहे. साखळी फेरीतील उर्वरित 50 सामने 13 एप्रिल ते 24 मे 2026 या कालावधीत देशातील 12 वेगवेगळ्या शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्याची सुरुवात हैदराबाद येथे सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याने होईल. याआधी बीसीसीआयने पहिल्या 20 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले होते.

नवीन वेळापत्रकानुसार 16 एफ्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किग्स संघात वानखेडे मैदानावर सामना होणार आहे. तब्बल तीन वर्षानंतर हे दोन्ही संघ वानखेडेवर आमनेसामने येणार आहे. याआधी 2023 च्या हंगामात मुंबई आणि पंजाबमध्ये वानखेडेवर सामना रंगला होता. या लढतीत पंजाबने मुंबईचा पराभव केला होता. त्यानंतर विविध कारणाने दोन्ही संघ वानखेडेवर भिडले नव्हते.

Comments are closed.