Mumbai News – बोलणं बंद केलं म्हणून 16 वर्षीय मुलीसह मित्रावर कोयत्याने हल्ला, आरोपीला पोलिसांकडून अटक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बोलणं बंद केलं म्हणून 16 वर्षीय मुलीसह तिच्या मित्रावर कोयत्याने हल्ला केल्याची खळबळजनक घटना मुलुंडमध्ये घडली. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आशिष बनसोड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आशिष आणि पीडित मुलगी दोघेही बदलापूर येथील रहिवासी आहेत. दोघेही एकमेकांना आधीपासून ओळखत होते. मुलीने काही वैयक्तिक कारणांमुळे मुलीशी बोलणे बंद केले होते. याच रागातून आरोपी मुलुंडमध्ये मुलीच्या कॉलेजजवळ आला आणि मुलीला गाठून तिच्यासह तिच्या मित्रावर कोयत्याने हल्ला केला.

याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीवर बदलापूरमध्ये विविध गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments are closed.