IPL 2026 – ऋषभ पंत सर्वात महागडा तर सर्वात कमी मानधन घेणारा कर्णधार कोण? वाचा…

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आयपीएल आणि अफाट पैसा हे जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दरवर्षी खेळाडूंचे संघ बदलतात आणि त्यासोबतच त्यांच्या मानधनाचे आकडेही गगनाला भिडतात. यंदाच्या IPL 2026 चा पहिला सामना 28 मार्च रोजी रंगणार आहे. मात्र, त्यापूर्वी संघांच्या कर्णधारांच्या पगाराची जोरदार चर्चा सुरू आहे. या हंगामात लखनौ सुपर जायंट्सचा (LSG) कर्णधार ऋषभ पंत हा सर्वात श्रीमंत कर्णधार ठरला आहे, तर दुसरीकडे अनुभवी अजिंक्य रहाणे सर्वात कमी मानधन असलेला कर्णधार ठरला आहे.

गेल्या हंगामात फारशी चमकदार कामगिरी करता आली नसली तरी, ऋषभ पंतने लिलावात नवा इतिहास रचला आहे. लखनौ सुपर जायंट्सने त्याला आपल्या संघात सामील करण्यासाठी तब्बल 27 कोटी रुपये मोजले आहेत. या विक्रमी किमतीमुळे तो आयपीएल 2026 मधील सर्वात महागडा कर्णधार बनला आहे. आता एवढ्या मोठ्या रकमेच्या ‘प्राइज टॅग’सह मैदानात उतरल्यावर पंत आपल्या कामगिरीने या मानधनाला न्याय देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकीकडे पंतवर कोट्यवधींची बरसात झाली असताना, दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) कर्णधार अजिंक्य रहाणेला तुलनेने खूपच कमी मानधन मिळत आहे. केकेआरने रहाणेला केवळ 1.5 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात कायम ठेवत कप्तानीची धुरा सोपवली आहे. ऋषभ पंतच्या 27 कोटींच्या तुलनेत रहाणेची ही रक्कम अतिशय अल्प मानली जात आहे. अनुभवाच्या जोरावर रहाणे केकेआरला विजेतेपद मिळवून देऊन या कमी मानधनाचे उत्तर देतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

Comments are closed.