परभणी न्यूज – कापूस जिनिंगला भीषण आग; शेकडो क्विंटल कापूस जळून राख झाला
परभणी मानवत शहराजवळील केशव जिनिंग प्रेसिंग उद्योगात आग लागून शेकडो क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मानवत-मानवत रोडदरम्यान असलेल्या या जिनिंगमध्ये मोठ्या प्रमाणात कापूस साठवून ठेवण्यात आला होता. गुरुवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास अचानक आग लागली.
घटनेची माहिती मिळताच मानवत नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन पथकाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या आगीत मोठ्या प्रमाणात कापूस जळाल्याने आर्थिक नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे.
Comments are closed.