इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन
ज्येष्ठ इतिहास संशोधक, विचारवंत, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचे खंदे पुरस्कर्ते डॉ. जयसिंगराव पवार यांचे आज निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनाने तत्त्वनिष्ठ, व्यासंगी, मराठेशाहीचा थोर इतिहासकार हरपला, अशी भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.
Comments are closed.