एअर इंडियाचे फ्लाइट मध्यमार्गे परत वळते.

दिल्ली-लंडन फेरी : तांत्रिक बिघाड होऊनही 7 तास हवेत

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

नवी दिल्लीहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे ए350 विमान गुरुवारी तांत्रिक बिघाडामुळे दिल्लीला परतले. हे विमान सुमारे सात तास हवेतच राहिले. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट्सनुसार, विमानाने गुरुवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास दिल्लीहून उ•ाण केले. सुमारे चार तासांनंतर सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत असताना परतण्याचा निर्णय घेण्यात आला. यादरम्यान ते सुमारे सात तास हवेत राहिल्यानंतर दुपारी 12:30 च्या सुमारास दिल्लीला परतले. विमानात काही विचित्र आवाज ऐकू आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून परतण्याचा निर्णय घेण्यात आला. दिल्लीत उतरल्यानंतर विमानाची तांत्रिक तपासणी करण्यात आली. एअरलाइनने प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत त्यांना लवकरात लवकर लंडनला पोहोचवण्यासाठी पर्यायी विमान पुरविण्याचा निर्णय जाहीर केला. यापूर्वी एअर इंडियाच्या विमानात 15 मार्च रोजी तांत्रिक बिघाड झाला होता. न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणारे विमान आयर्लंडमधील शॅनन येथे वळवावे लागले होते.

Comments are closed.