बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर संयुक्त कृती समितीची बैठक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बेस्ट उपक्रमाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱयांची विविध थकीत देयके तसेच सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱयांच्या विविध प्रश्नांवर बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने ठोस भूमिका घेतली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारी पातळीवर आवाज उठवण्याच्या अनुषंगाने समितीची महत्त्वपूर्ण बैठक नरिमन पॉइंट येथे पार पडली. शिवसेनाप्रणीत बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत कर्मचाऱयांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी बेस्ट कामगार सेनेचे सरचिटणीस, शिवसेना उपनेते नितीन नांदगावकर, प्रमुख सल्लागार गौरीशंकर खोत, उदय आंबोणकर, विलास पवार, पवन गायकवाड, नितीन पाटील, हरीश गायकवाड, नासिर अहमद, गजानन नागे, अमित चव्हाण, ज. म. कहर, नेहा भगत, संतोष काटकोरे, देवेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.

Comments are closed.