नायजेरियात दहशतवादी हल्ल्यात 11 जण ठार
नायजेरियाच्या उत्तर-पश्चिमी राज्य केब्बीमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर केलेल्या अचानक हल्ल्यात 9 सैनिक, एक पोलीस कर्मचारी आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला अशा वेळी झाला, ज्या वेळी सुरक्षा दल एक सूचना मिळाल्यानंतर कारवाई करण्यासाठी जात होते. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर अचानक अंदाधुंद गोळीबार केला. ही घटना शांगा परिसरात रात्री उशिरा झाल्याची माहिती सरकारी प्रवक्त्या साकाa यांनी दिली. दहशतवादी हल्ल्यात मोठे नुकसान झाले आहे. काही वाहनांनाही जाळण्यात आले आहे. हल्ल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे. दोषींना पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.
Comments are closed.