8.5 रेटिंगची हि सीरिज, 6 मिलियनहून अधिक व्ह्यूज, तर याचा प्रत्येक एपिसोड पाहु शकता फ्रीमध्ये – Tezzbuzz

आज-काल ott कंटेंट पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. कारण ओटीटीवर नवनवीन कन्टेन्ट तसेच घरबसल्या अनेक प्रकारच्या सिरीज मालिका चित्रपट पाहू शकतो. मात्र या ओटीटीच्या युगातही, लोक अजूनही यूट्यूबवर त्यांच्या आवडत्या वेब सिरीज पाहत आसतात. कारण ओटीटीवर अनेक प्रसिद्ध चित्रपट आणि मालिका हे फेमस होतच असतात मात्र याच युगात एक हलक्या फुलक्या रचनाची कथा you tube वर आली होती, आणि ही वेब सिरीज म्हणजे सोलमेट. ही सिरीज लोकांना प्रचंड आवडली आहे. तर या वेब सिरीज मध्ये जास्त प्रमाणात गाजलेले कलाकार नसले तरीही ही सिरीज हिट ठरली आहे

एकमेव जोडीदार (Soulmate)हि एक अशी वेब सिरीज आहे जी मिलेनियल्स आणि जेन-झी या दोन्ही पिढ्यांना ही मिनी-सिरीज आपलीशी वाटेल. कथेची सुरुवात शिलाँगच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये होते, जिथे एक महत्त्वाकांक्षी संगीतकार स्वतःला शोधण्यासाठी येतो आणि त्याच्या शाळेतील मित्राला भेटतो. त्याच्या कुटुंबाने घेतलेल्या काही निर्णयांनी व्यथित झालेला तो एकटाच बाईक रोड ट्रिपवर निघालेला असतो. ते दोघे पुन्हा एकत्र येतात, एकत्र आपला एकट्याचा प्रवास सुरू ठेवतात. ही मालिका ईशान्य भारतातील सुंदर दऱ्यांचे दर्शन घडवते. त्यांच्यात एक घट्ट मैत्री निर्माण होते, जी दाखवते की एकट्याच्या प्रवासातही चांगले मित्र कसे मिळू शकतात.

सोलमेट हि  सिरीज झूम टीव्हीच्या बॅनरखाली निर्मित, ही एक रोमँटिक ट्रॅव्हल मालिका असून तिला IMDb वर 8.5 रेटिंग मिळाले आहे. मालिकेच्या पहिल्या भागाला आधीच 60 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि इतर सर्व भागांना प्रत्येकी 25 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

ह्या आभिनेत्याला राजामौलींच्या चित्रपटातून मिळाली ओळख, वडिलही आहेत या इंडस्ट्रीत मोठे स्टार

Comments are closed.