Show Must Go On…! मंचावर फजिती झाली तरी सौदर्यवतीने जिंकली प्रेक्षकांची मने

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सौंदर्य स्पर्धांमध्ये अनेकदा अनपेक्षित घटना घडत असतात. अशीच एक घटना ‘मिस ग्रँड थायलंड 2026’ (Miss Grand Thailand 2026) च्या मंचावर घडली. या घटनेची संपूर्ण जगभर चर्चा सुरू झाली आहे. ‘मिस ग्रँड थायलंड मधील स्पर्धक कामोलवान चानागो (Kamolwan Chanago) स्टेजवर आपला परिचय देत असताना अचानक तिचे कृत्रिम दात (Veneers) तोंडातून बाहेर पडले. भर कार्यक्रमात घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ तिथे शांतता पसरली.या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

अशा प्रकराची घटना कोणत्याही मॉडेलसाठी अत्यंत लाजिरवाणी ठरू शकली असती. मात्र कामोलवानने ती परिस्थिती अत्यंत संयमाने सांभाळली. दात पडल्याचे लक्षात येताच तिने क्षणार्धात स्वतःला सावरले. तिने कॅमेऱ्याकडे पाठ केली, शांतपणे आपले दात पुन्हा जागेवर नीट बसवले आणि काही सेकंदातच पुन्हा प्रेक्षकांसमोर येऊन हसतमुख चेहऱ्याने आपले भाषण पूर्ण केले.

कामोलवानचा हा आत्मविश्वास पाहून तिथे उपस्थित प्रेक्षक आणि परीक्षकही थक्क झाले. गोंधळून न जाता तिने ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली, त्यासाठी तिचे टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक करण्यात आले. भाषण संपल्यानंतर तिने अतिशय आत्मविश्वासाने आपली रॅम्प वॉक पूर्ण केली आणि कॅमेऱ्याकडे पाहून एक सुंदर हास्यही दिले.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकरी तिचे ‘प्रोफेशनलिझम’ पाहून थक्क झाले आहेत. अनेकांनी तिच्या या कृतीला “एक आदर्श सादरीकरण” असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी तिच्या धैर्याचे कौतुक करत “संकटातही आत्मविश्वास कसा टिकवावा, हे तिने दाखवून दिल्याचे म्हणत तिचे कौतुक केले आहे. या एका घटनेमुळे कामोलवान आता जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे.

Comments are closed.