हा युद्धगुन्हा आहे, चूक नाही! मिनाबमधील शाळेवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यावरून इराणने अमेरिकेला फटकारले
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात गेल्या महिन्याभरापासून युद्ध सुरू आहे. या युद्धाच्या सुरुवातीला इराणमधील एका शाळेवर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला होता. यात 175 हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांचा मृत्यू झाला होता. यावरून आता इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी शुक्रवारी अमेरिकेवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. मिनाबमधील शाळेवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ला ही चूक नसून युद्धगुन्हा आहे, अशा शब्दात अराघची यांनी अमेरिकेची पिसं काढली.
दक्षिण इराणमधील मिनाब शहरात असलेल्या शजराह तय्यबा प्राथमिक शाळेवर झालेला बॉम्बहल्ला हा टप्प्याटप्प्याने केलेला सुनियोजित हल्ला होता. या हल्ल्यात 175 हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली, असे अराघची संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेला व्हिडिओद्वारे संबोधित करताना म्हणाले.
अमेरिका आणि इस्रायल स्वत:कडे अत्यंत प्रगत युद्ध तंत्रज्ञान आणि अचूक डेटा सिस्टीम असल्याचा दावा करतात. अशा परिस्थितीत शाळेवर झालेला हा हल्ला मुद्दाम आणि हेतुपुरस्सर नव्हता यावर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही. ही क्रूरता लपवली जाऊ शकत नाही किंवा ती समर्थनीय नाही. यावर सर्वांनी स्पष्ट शब्दांत निषेध नोंदवून दोषींना जबाबदार धरले पाहिजे, असे अराघची म्हणाले. तसेच प्राथमिक शाळेवरील हा हल्ला केवळ एखादी साधी घटना किंवा चुकीचा अंदाज नव्हता. अमेरिकेने आपली जबाबदारी झटकण्यासाठी दिलेली परस्परविरोधी विधाने त्यांचा गुन्हा लपवू शकत नाहीत, असेही ते म्हणाले.
#पाहा | इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची म्हणतात, “आक्रमकतेचे हे युद्ध स्पष्टपणे अन्यायकारक आहे. त्यांनी, अमेरिका आणि इस्रायलने 28 फेब्रुवारी रोजी ही आक्रमकता सुरू केली… मिनाबमधील शाजराह तय्यबेह प्राथमिक शाळेला लक्ष्य करणे हा युद्ध गुन्हा होता, ज्याची मागणी… pic.twitter.com/6AbHriA3QF
— ANI (@ANI) 27 मार्च 2026
Comments are closed.