Temple : या मंदिरात मिळतो डोसा, चायनीज फूडचा प्रसाद

मंदिराची भूमी म्हणून भारताकडे पाहिले जाते. येथील प्रत्येक मंदिराचं वेगळं वैशिष्ट्य आणि एखादी रंजक कथा आहे. मंदिराची पायाभरणी, कलश ते मंदिरातील प्रसाद यात विविधता दिसून येते. साधारपणे मंदिरात लाडू, चणे-फुटाणे, शिरा असा प्रसाद असतो. पण देशात अशी काही मंदिरे आहेत जिथे डोसा, चॉकलेट, नूडल्स देतात. आजच्या लेखात जाणून घेऊयात ही मंदिरे आणि तेथील प्रसाद,

मुरुगन मंदिर, केरळ

केरळमधील अलपुझ्झा असलेले थेक्कन पझानी बालामुरूगन मंदिरात चॉकलेटचा प्रसाद मिळतो. येथे भक्त चॉकलेटचे बॉक्स घेऊन येतात आणि नंतर त्याचे वाटप केलं जातं.

अजगर मंदिर, चेन्नई

या मंदिरात भगवान विष्णूच्या अवताराला डोसा अर्पण केला जातो. हा डोसा विविध धान्यांपासून बनवण्यात येतो.

कर्णीमाता मंदिर, बिकानेर

राजस्थानातील बीकानेर येथे करणी माता मंदिरात हजारो उंदीर मुक्तपणे फिरताना दिसतात. येथे उंदरांनी खाल्लेला उष्टा प्रसाद देण्यात येतो.

मंदिराचा प्रसाद चायनीज पदार्थ आहे

कामाख्या मंदिर, गुवाहाटी

आसाममधील कामाख्या मंदिरात दरवर्षी ‘अंबुबाची मेला’ भरतो. या काळात मंदिर तीन दिवस बंद ठेवले जाते. चौथ्या दिवशी भक्तांना प्रसाद म्हणून खाण्याचा पदार्थ न देता लाल रंगाचा ओलसर कापड दिला जातो.

जगन्नाथ मंदिर, पुरी

ओडीशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिराची स्वयंपाकघर व्यवस्था जगातील सर्वात मोठ्या मंदिर स्वयंपाकघरपैंकी एक आहे. येथे छप्पन भोग म्हणून प्रसाद दिला जातो.

काली मंदिर, कोलकाता

कोलकत्यातील टांगरा भागातील चायनीज काली मंदिर विशेष चर्चेत आहे. येथे देवीला नूडल्स, फ्राईड राईस आणि मंचूरियनसारखे पदार्थ नैवैद्यात दिले जातात.

हेही वाचा – रंग बदलणारे शिवलिंग ते बेडकाची पूजा

Comments are closed.