RCB vs SRH: हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी विराट कोहली किती फिट? आरसीबीच्या मुख्य प्रशिक्षकांनी दिली मोठी अपडेट

विराट कोहलीचा आरसीबी (RCB) संघ आयपीएलच्या 19 व्या हंगामात आपले जेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरत आहे. संघाचा पहिला सामना 28 मार्च रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (RCB vs SRH) होणार आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा विराट कोहलीवर (Virat Kohli) असतील. यंदाच्या स्पर्धेत उतरण्यापूर्वी विराट जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. सराव सामन्यात त्याने केवळ 19 चेंडूत 45 धावांची तुफानी खेळी केली होती. आता संघाचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर (Andy flower on virat kohli) यांनी त्याच्या फिटनेसबाबत मोठे विधान केले आहे.
आयपीएलच्या पहिल्या सामन्यापूर्वी माध्यमांशी बोलताना अँडी फ्लॉवर यांनी विराटच्या फिटनेसचे कौतुक केले. ते म्हणाले, विराटमध्ये धावांची भूक अजूनही कायम आहे. मला वाटते की तो सध्या मानसिक आणि भावनिकदृष्ट्या खूप सकारात्मक स्थितीत आहे. एक व्यावसायिक खेळाडू म्हणून तो स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने तयार करत आहे. सरावादरम्यान त्याचा टायमिंग पाहून असे वाटते की तो त्याच्या फॉर्मच्या शिखरावर आहे.
विराट कोहलीची आयपीएलमधील आकडेवारी पाहिली तर ती थक्क करणारी आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे. गेल्या तीन हंगामात त्याने सातत्याने 600 पेक्षा जास्त धावांचा टप्पा ओलांडला आहे. या हंगामात त्याच्याकडे 9 हजार धावा पूर्ण करण्याची सुवर्णसंधी असून, असा पराक्रम करणारा तो पहिला फलंदाज ठरेल. गेल्या हंगामात त्याने 15 सामन्यांत 54.75 च्या सरासरीने आणि 144.71 च्या स्ट्राईक रेटने 657 धावा केल्या होत्या.
Comments are closed.