‘स्माईल पॉवर’साठी मुंबई इंडियन्सची, कोलगेट टोटलसह भागीदारी
मैदानावर चौकार-षटकारांचा वर्षाव करणाऱ्या मुंबई इंडियन्सने आता फिटनेससोबतच दातांच्या आरोग्यावरही लक्ष केंद्रित करत नवी इनिंग सुरू केली आहे. आयपीएलच्या नव्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने कोलगेट टोटलसोबत ‘डेंटल परफॉर्मन्स पार्टनर’ म्हणून भागीदारी करत एक वेगळाच ट्रेंड सेट केला आहे.
या भागीदारीतून खेळाडूंच्या एकूण फिटनेससोबतच त्यांच्या ओरल हेल्थला (दातांच्या आरोग्याला) तितकेच महत्त्व दिले जाणार आहे. कोलगेट टोटलने यासाठी ‘प्लॉट’ (परफॉर्मन्स लिंक्ड ओरल टेस्ट) हा अभिनव उपक्रम सादर केला आहे. हा एक अत्याधुनिक ओरल हेल्थ स्क्रिनिंग फ्रेमवर्क असून खेळाडूंच्या दातांची नियमित तपासणी आणि देखभाल यावर भर देतो. या उपक्रमांतर्गत आघाडीचे दंततज्ञ डॉ. मोईझ खाकियानी प्रगत इंट्राओरल स्पॅनिंग तंत्रज्ञान आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांचा वापर करून मुंबईच्या खेळाडूंची सखोल तपासणी करणार आहेत.
Comments are closed.