ठाण्यात आजपासून जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ठाणे जिल्हा कॅरम संघटनेच्या वतीने आयोजित जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेला 28 मार्चपासून बाळासाहेब ठाकरे स्मारक सभागृह, तीन हात नाका येथे सुरुवात होत आहे. 28 ते 31 मार्चदरम्यान रंगणाऱया या स्पर्धेत सुमारे 350 खेळाडू सहभागी होणार असून, चार दिवस कॅरमचा रोमांचक थरार पाहायला मिळणार आहे.

स्पर्धेचे उद्घाटन उद्या सकाळी 8.30 वाजता होणार असून, त्यानंतर पुरुष दुहेरी सामने सुरू होतील. पुढील दिवसांत पुरुष एकेरी, सांघिक गट, महिला व ज्येष्ठ गटातील सामने रंगणार असून, 31 मार्च रोजी अंतिम फेरी व पारितोषिक वितरण सोहळा पार पडेल. या स्पर्धेत 20 संघांसह पुरुष एकेरी, दुहेरी, महिला व ज्येष्ठ गटातील सामने खेळवले जाणार आहेत. आंतरराष्ट्रीय खेळाडू संजय मांडे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते पंकज पवार तसेच इम्रान अहमद, अस्लम चिकटे, अब्दुल सत्तार यांसारखे नामांकित खेळाडू सहभाग घेणार आहेत. अरुण केदार व डॉ. दीपक वझे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल अशी माहिती जितेंद्र दळवी यांनी दिली.

Comments are closed.