पंतप्रधान मोदींचे पुन्हा कौतुक
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून कौतुक
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी हे दोन नेते कोणत्याही कार्यात यशस्वी होऊ शकतात, अशा अर्थाचा संदेश अध्यक्ष ट्रम्प यांनी प्रसारित केला आहे. अमेरिकेच्या भारतातील दूतावासाकडून या संदेशाला प्रसिद्धी देण्यात आली. आखाती युद्धाच्या सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अध्यक्ष ट्रम्प यांनी व्यक्त केलेला विश्वास महत्वाचा मानण्यात येत आहे.
‘भारतासमवेतच्या दृढ संबंधांना अमेरिका अत्याधिक महत्व देत आहे’, असे स्पष्ट करत अमेरिकेच्या भारतातील दूतावासाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची छायाचित्रे असलेला संदेशही सोशल मिडियावरून प्रसारित केला आहे. ‘भविष्यकाळात दोन्ही देशांमधील ही मैत्री अधिकच दृढ होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी कोणतेही कार्य योग्य प्रकारे यशस्वी करु शकतो’ हा ट्रम्प यांचा संदेशही अमेरिकेच्या दूतावासाने प्रसारित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या मंगळवारी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. दोन्ही नेत्यांनी शांतता, होर्मुझची सामुद्रधुनी आणि सध्याची जागतिक परिस्थिती यांच्यासंबंधी विस्तृत चर्चा केल्याची माहिती या चर्चेनंतर देण्यात आलेली होती.
भारताकडून शांततेचे समर्थन
युद्धतणाव कमी करणे आणि शांततेच्या मार्गाने, तसेच चर्चेच्या माध्यमातून सर्व समस्यांची उकल करणे, या प्रक्रियेला भारताने नेहमीच प्राधान्य दिले आहे. सध्याच्या युद्धाच्या परिस्थितीतही हीच भारताची भूमिका आहे. होर्मुझची सामुद्रधुनी व्यापार आणि इंधनाची वाहतूक यांच्यासाठी नेहमीच मुक्त राहिली पाहिजे, हे भारताचे धोरण आहे. भारताने या युद्धाच्या प्रारंभापासून या धोरणाचा उच्चार केला आहे, असे भारताच्या परराष्ट्र व्यवहार विभागानेही वेळोवेळी स्पष्ट केले आहे.
सर्जियो गोर यांच्याकडून दुजोरा
अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जियो गोर यांनीही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी वाहतुकीसाठी मुक्त ठेवली जाण्याचे महत्व दोन्ही देश जाणतात. यासंबंधी दोन्ही
Comments are closed.