मध्य प्रदेशात झालेल्या अपघातात 10 जणांचा मृत्यू

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातून परतणारी बस ट्रकला धडकली

वृत्तसंस्था/ छिंदवाडा

मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिह्यात गुरुवारी रात्री एक मोठा अपघात झाला. बस आणि पिकअप ट्रक यांच्या धडकेत दोन्ही वाहनांच्या चालकांसह 10 जणांचा मृत्यू झाला. तसेच 30 हून अधिक जण जखमी झाले. या अपघातात एक महिला आणि एका मुलाचा हात तुटला असून इतर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. छिंदवाडा येथे गुरुवारी संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या सार्वजनिक कार्यक्रमातून परतणाऱ्या बसची पिकअप ट्रकला धडक बसल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय पांडे यांनी दिली. जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर नागपूर रोडवरील सिमरियाजवळ हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी बसमध्ये 40 हून अधिक प्रवासी होते. जखमींना रुग्णवाहिका आणि इतर वाहनांमधून जिल्हा रुग्णालय आणि जवळच्या इतर वैद्यकीय केंद्रांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Comments are closed.