बीएड सीईटी ’सर्व्हर’मध्ये बिघाड, नागपूर, नांदेड, परभणीत परीक्षा पुढे ढकलली
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) घेण्यात येत असलेल्या बीएड अभ्यासक्रमाच्या परीक्षेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. सर्व्हरमध्ये झालेल्या बिघाडामुळे नागपूर, नांदेड आणि परभणी येथील तीन केंद्रांवरील परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की सीईटी कक्षावर ओढवली आहे.
बीएड अभ्यासक्रमाच्या सीईटीला आजपासून सुरुवात झाली. 27 ते 29 मार्च दरम्यान चालणाऱया या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी नांदेड, परभणी व नागपूर येथील केंद्रांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परीक्षेची वेळ सकाळी 11 ते 12ः30 अशी असतानाही अनेक तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा वेळेवर सुरू होऊ शकली नाही. परिणामी परीक्षा पुढे ढकलण्यात आली.
Comments are closed.