गुपचूप ‘धुरंधर 2’ पाहायला पोहोचली यामी, स्वतःचा कॅमिओ दिसताच लाजेने लाल झाले गाल – Tezzbuzz
सध्या बॉलीवूडमध्ये धुमाकूळ घालत असणारा चित्रपट म्हणजे धुरंदर 2, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आहे आणि अजून सध्या करत आहे. तर याचे श्रेय दिग्दर्शक आदित्य धर यांना जाते तसेच संपूर्ण टीमलाही जाते. यातील चित्रपटाचे कथा तसेच अभिनेत्यांचे अभिनय यामुळे कौतुक होत आहे. ‘धुरंधर 2’ हा चित्रपट 19 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. तर आता नुकतेच, यामी गौतम ‘धुरंधर 2’ पाहण्यासाठी प्रक्षेकांनी भरलेल्या चित्रपटगृहात गेली होती. पडद्यावर आपली छोटी भूमिका पाहून ती आंनदीत झाली.यामी गौतमची बहीण, सुरिलीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. ही क्लिप शेअर करताना सुरिलीने एक भावनिक संदेश लिहिला आहे: “पुन्हा एकदा, एकमेव आदित्य धरला सलाम.
व्हिडिओमध्ये, ‘धुरंधर 2’ मधील आपली छोटी भूमिका पाहताना यामी खूप लाजरी दिसली. थिएटरमधील प्रेक्षकांना तिची उपस्थिती कळू नये म्हणून, ती आपला चेहरा लपवताना आणि सुरिलीला शांत राहण्याचा इशारा देण्यासाठी ओठांवर बोट ठेवतानाही दिसली. इंटरनेट वापरकर्त्यांनी हे लगेचच ओळखले. आणि त्यांना वाटले की ‘धुरंधर 2’ पाहिल्यानंतर यामी गौतमची प्रतिक्रिया एखाद्या उत्सवासारखी होती.
एका चाहत्याने लिहिले, “धुरंधर 2 मध्ये स्वतःला पडद्यावर पाहून यामी (yami)गौतम लाजली, किती गोड” दुसऱ्या एका चाहत्याने म्हटले, “आदित्य धरने ‘धुरंधर’ सुरू होण्यापूर्वी आपली पत्नी यामी गौतमसाठी एक खास आभार मानणारी स्लाईड दाखवली.” तर यामी आणि आदित्य यांनी 4 जून 2021 रोजी लग्न केले. त्यांच्या लग्नानंतर जवळपास तीन वर्षांनी, या जोडप्याला मुलगा झाला. यामीने 10 मे 2024 रोजी त्यांचा मुलगा वेदविद, याचे तिच्या घरी स्वागत केले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
मनोज बाजपेयी यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात लावली हजेरी; व्यक्तिमत्व हक्कांविषयी केले भाषण
पोस्ट गुपचूप ‘धुरंधर 2’ पाहायला पोहोचली यामी, स्वतःचा कॅमिओ दिसताच लाजेने लाल झाले गाल वर प्रथम दिसू लागले दैनिक बोंबाबोंब.
Comments are closed.