अमेरिका एअरफोर्स बेसबाहेर स्फोटक मिळाल्याने खळबळ
अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील मॅकडिल एअरफोर्स बेसबाहेर स्फोटके आणि शस्त्रास्त्रे मिळाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघा बहीण-भावाविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. एलन झेंग आणि एन मॅरी झेंग असे या दोघांचे नाव आहे. सरकारी संपत्तीला नुकसान पोहोचवणे, धोकादायक स्फोटक पदार्थ बनवणे, विनानोंदणी शस्त्र बाळगणे यांसारखे गंभीर आरोप पोलिसांनी ठेवले आहे, तर त्याच्या बहिणीवर पुरावा लपवणे आणि गुह्यात मदत करणे यांसारखे आरोप ठेवले आहेत.
Comments are closed.