1100 कोटीच्या क्लबमध्ये ‘धुरंधर 2’ची एंट्री, बॉक्स ऑफिस कमाईमध्ये ‘पठान’-‘जवान’ला टाकलं मागे – Tezzbuzz

रणवीर सिंग अभिनीत ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चर्चेचा विषय ठरला आहे. तर सध्या बॉलीवूडमध्ये धुमाकूळ घालत असणारा चित्रपट म्हणजे धुरंदर 2 आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आहे आणि अजून सध्या करत आहे. तर याचे श्रेय दिग्दर्शक आदित्य धर यांना जाते तसेच संपूर्ण टीमलाही जाते. यातील चित्रपटाचे कथा तसेच अभिनेत्यांचे अभिनय यामुळे कौतुक होत आहे. ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट 19 मार्च ला चित्रपटगृहात प्रदर्शित झाली आहे. ‘धुरंधर २’ ने ‘पुष्पा २’ सारख्या मोठ्या चित्रपटाना मागे टाकत बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे.

‘धुरंधर 2’च्या एकूण जागतिक कलेक्शनने 1100 कोटीचा टप्पा ओलांडला आहे. भारतात, ‘धुरंधर 2’ ने नऊ दिवसांत 800 कोटी पेक्षा जास्त कमाई केली आहे, ‘धुरंधर 2’ने  त्याचे निव्वळ कलेक्शन 7 कोटीचा टप्पा ओलांडले आहे. ‘धुरंधर 2 या चित्रपटाने पठाण आणि पुष्पा 2 या चित्रपटांनाही बॉक्स ऑफिस कमाई मध्ये मागे टाकले आहे.

सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘धुरंधर 2’ ने भारतात दुसऱ्या शुक्रवारी, 27 मार्च 2026 रोजी, 41.55 कोटी रुपयांचे निव्वळ कलेक्शन केले होते. जे आदल्या दिवसाच्या 49.70 कोटी रुपयांच्या कलेक्शनपेक्षा 32 टक्के कमी आहे. या आकडेवारीनुसार, आदित्य धरा (Dhar)दिग्दर्शित या स्पाय थ्रिलरचे देशांतर्गत बाजारपेठेतील निव्वळ कलेक्शन 715.75 कोटी रुपये आणि एकूण कलेक्शन 854.99 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. याशिवाय, परदेशातील कमाई 274 कोटी रुपये  झाली असून, त्यामुळे ‘धुरंधर: द रिव्हेंज’चे जगभरातील एकूण कलेक्शन 1128.99 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

प्राइम व्हिडिओवरील दमदार सिरीज, पहिल्या 9 एपिसोड्सनी जिंकली मनं, तर आता येतोय पार्ट 2

Comments are closed.