अशोक खरातसारख्या नराधमांना भर चौकात उभं करून सुया टोचून मारलं पाहिजे, मुनगंटीवारांचा संताप
धार्मिक अंधश्रद्धेचा आधार घेत महिलांचे लैंगिक शोषण करणारा अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. राज्यातील काही मंत्री देखील या प्रकरणात अडकलेले आहेत. त्यामुळे सध्या या प्रकरणावरून अनेकांवर टांगती तलवार लटकत आहे. या प्रकरणी शुक्रवारी रात्री रुपाली चाकणकर यांनी अजित पवार गटाच्या महिला अध्यक्षपदाचा देखील राजीनामा दिला. त्यावर बोलताना भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अशोक खरातवर जोरदार निशाणा साधला.
”रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला हे योग्यच आहे. कारण हे प्रकरण अतिशय भयंकर आहे. खरेतर खरातला कायद्याने शिक्षा व्हावी, असे मला वाटत असले तरी अशा नराधमांना चौकात उभं करून सुया टोचून टोचून मारले पाहिजे, असा संताप भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. एका दिवसासाठी कायदा बदलून या नराधमाला भर चौकात शिक्षा दिली पाहिजे, असेही मुनगंटीवार म्हणाले.
Comments are closed.