आमच्या गल्लीतील पोरं भारी, पाकिस्तानच्या किंगची जगभर नाचक्की! बाबर आझमने गादीवरचा कॅचही सोडला
बाबर आझम पीएसएल 2026 ट्रोल: बाबर आझम (Babar Azam) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पण यावेळी त्याच्या बॅटिंगमुळे नाही तर एका ‘मिस’ झालेल्या कॅचमुळे आला आहे. पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League) 2026 सुरू होण्यापूर्वीच पेशावर झल्मीचा कर्णधार सोशल मीडियावर ट्रोलिंगचा विषय ठरला आहे.
गादीवरचा कॅचही सोडला, बाबर ट्रोल…
हंगामाच्या चालू होण्यापूर्वी बाबर एका जाहिरातीच्या शूटिंगमध्ये सहभागी झाला होता. त्या शूटमध्ये त्याला उजव्या बाजूला डाईव्ह मारून कॅच पकडायचा होता. सुरक्षिततेसाठी खाली दोन फोमची गादी ठेवण्यात आली होती. चेंडू टाकताच बाबरने जोरदार डाईव्ह मारली आणि सुरक्षितपणे गादीवर पडला, पण कॅच मात्र हातातून निसटला. हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि ट्रोलिंगला सुरुवात झाली.
सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
व्हिडिओ व्हायरल होताच चाहत्यांनी बाबरला चांगलंच लक्ष्य केलं. एका युजरने मजेशीर कमेंट करत लिहिलं, “गादी देणाऱ्या कंपनीलाही माहित होतं की बाबर कॅच सोडणार, म्हणून आधीच बेड तयार ठेवला.” तर दुसऱ्या एका भारतीय युजरने टोमणा मारला, “गादीवरसुद्धा कॅच पकडत नाही, मग गादी नसती तर काय झालं असतं?” काहींनी तर थेट असंही म्हटलं की, या शूटचे पैसेसुद्धा बाबरला मिळणार नाहीत, आणि आमच्या गल्लीतील पोरं भारी आहे.
बाबर आझम यांनी किंग कोहलीसारख्या व्यंगचित्रांवर बंदी घालण्यास सुरुवात केली.
अगदी जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान त्याने एक झेल सोडला – बाबर आझमसाठी आणखी एक अपमान.😭 pic.twitter.com/PwmE39nVEn
— सोनू (@Cricket_live247) 28 मार्च 2026
रिकाम्या स्टेडियमची चिंता
मैदानाबाहेर ट्रोलिंग सुरू असताना मैदानातही आव्हानं कमी नाहीत. राजकीय तणावामुळे यंदाचा PSL पूर्णपणे प्रेक्षकांशिवाय खेळवला जाणार आहे. बाबरनेही मान्य केलं की, प्रेक्षकांशिवाय खेळणं कठीण जाणार आहे. तो म्हणाला, “स्टेडियममध्ये फॅन्स नसल्याची कमतरता जाणवेल. पण टीव्हीवर पाहणाऱ्या चाहत्यांसाठी आम्ही उत्तम क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करू.”
बॉलिंग लाइन अप आत्मविश्वास
मागील हंगामात पेशावर झल्मीची गोलंदाजी कमकुवत दिसली होती. मात्र यावेळी संघाकडे मजबूत बॉलिंग युनिट असल्याचा बाबरला विश्वास आहे. योग्य रणनीतीसह संघ मैदानात उतरेल आणि चांगली कामगिरी करेल, असा त्याने विश्वास व्यक्त केला.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.