BCCIच्या धाकाने बांगलादेशचा माज उतरला; IPL बंदीचा निर्णय कचऱ्याच्या पेटीत, एका रात्रीत नेमकं का
बांगलादेशने IPL 2026 च्या प्रसारणावरील बंदी उठवली आयपीएल 2026 (IPL 2026) चा हंगाम रॉयल चॅलेंजर्स बगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद (RCB VS SRH) यांच्यातील सामन्याने सुरू होत आहे. हा आयपीएलचा 19वा असून या स्पर्धेचे प्रसारण जगभरात केले जाते. मात्र, बांगलादेशने (Bangladesh) आधी मतभेदांमुळे आपल्या देशात आयपीएल प्रसारणावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यांनी या निर्णयावर यू-टर्न घेत आयपीएल 2026 चे सामने देशात प्रसारित करण्यास परवानगी दिली आहे.
IPL बंदीच्या निर्णयावरून बांगलादेशचा धक्कादायक ‘यू-टर्न’ (Bangladesh clears IPL broadcast)
हा निर्णय त्या वादानंतर दोन महिन्यांनी घेतला गेला आहे, ज्यामध्ये मुस्तफिझुर रहमान (Mustafizur Rahman) यांना स्पर्धेतून बाहेर करण्यात आल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर बांग्लादेश सरकारने आयपीएलवर पूर्ण बंदी जाहीर केली होती. आता नव्या माहिती व प्रसारण मंत्र्यांनी, जाहिर उद्दीन स्वपन यांनी हा निर्णय मागे घेतल्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, कोलकाता नाइट रायडर्सने मुस्ताफिजूर रहमानला 9.2 कोटी रुपयांत खरेदी केले होते, मात्र बीसीसीआयच्या निर्देशानुसार त्याला रिलीज करण्यात आले. बांगलादेशमधील हिंदू अल्पसंख्यकांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. या घटनेनंतर बांगलादेश क्रिकेट मंडळ आणि बीसीसीआय यांच्यातील संबंध ताणले गेले होते, इतकेच नव्हे तर बांग्लादेशने आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 मधूनही आपले नाव मागे घेतले होते.
IPL बंदीचा निर्णय कचऱ्याच्या पेटीत, एका रात्रीत नेमकं काय घडलं? (Bangladesh clears IPL broadcast)
अलीकडे मात्र दोन्ही क्रिकेट बोर्डांमध्ये संबंध सुधारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. स्वापन यांनी स्पष्ट केले की, “आयपीएल प्रसारणासाठी आमच्याकडे अद्याप कोणतेही औपचारिक अर्ज आलेले नाहीत. आम्ही क्रीडा आणि राजकारण एकत्र करू इच्छित नाही. कोणताही चॅनल आयपीएल प्रसारित करू इच्छित असेल, तर आम्ही त्याचा सकारात्मक विचार करू.”
तसेच, बांगलादेश केबल ऑपरेटर संघटनानेही या निर्णयाचे स्वागत केले आहे. संघटनेचे सचिव रेजाउल करीम लाब्लू यांनी सांगितले की, आता देशात आयपीएल प्रसारणावर कोणतीही बंदी नाही आणि अंतरिम सरकारचे जुने आदेश लागू राहिलेले नाहीत.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.