MS धोनीला काय झालं?, माहीचं हे रूप कधीच पाहिलं नसेल; 3 व्हिडिओनी सोशल मीडियावर उडवून दिली खळबळ

एमएस धोनी आयपीएल 2026 मधून बाहेर : आयपीएलच्या (IPL 2026) 19व्या हंगामाच्या सुरुवातीला अवघे काही तास उरले असताना चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) मोठा धक्का बसला आहे. संघाचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज आणि सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक महेंद्र सिंग धोनी (MS Dhoni) दुखापतीमुळे सुरुवातीचे दोन आठवडे स्पर्धेबाहेर राहणार आहे. त्यामुळे चाहत्यांसाठी ही निराशाजनक बातमी ठरली आहे.

सीएसकेकडून अधिकृत पुष्टी

धोनीच्या दुखापतीची अधिकृत माहिती स्वतः सीएसकेने दिली आहे. संघाने आपल्या अधिकृत X (ट्विटर) अकाउंटवर पोस्ट करत सांगितले की, “एमएस धोनी सध्या काफ स्ट्रेनसाठी रिहॅबमध्ये आहे. परिणामी, तो टाटा आयपीएल 2026 च्या पहिल्या दोन आठवड्यांना मुकण्याची शक्यता आहे.”

व्हिडिओमधून स्पष्ट झाली दुखापत

दरम्यान, धोनीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये तो मैदानावर लंगडत चालताना दिसतो. एका व्हिडिओमध्ये तो कोणाच्या आधाराने चालताना दिसतो आणि त्याच्या चालण्यात स्पष्टपणे त्रास जाणवत आहे. योग्य प्रकारे चालताही येत नसल्याचे दिसून येते. सरावादरम्यान एक दिवस आधी त्याला स्नायूंमध्ये ताण जाणवला होता, अशी माहिती समोर आली आहे.

2023 ची आठवण

हे पहिल्यांदाच नाही की धोनी दुखापतीशी झुंज देत आहे. 2023 सालीही त्याला गुडघ्याची गंभीर दुखापत झाली होती. मात्र, त्या वेदनेतही त्याने संघासाठी खेळणे सुरू ठेवले होते, ज्यामुळे त्याची जिद्द पुन्हा एकदा दिसून आली होती.

सीएसकेचे सुरुवातीचे सामने

आयपीएल 2026 मध्ये सीएसकेचा पहिला सामना 30 मार्च रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे. त्यानंतर 3 एप्रिलला पंजाब किंग्स, 5 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि 11 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामने खेळले जाणार आहेत. चाहत्यांची नजर आता 14 एप्रिलकडे लागली आहे, कारण त्या दिवशी कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी धोनी पुनरागमन करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा –

BCCIच्या धाकाने बांगलादेशचा माज उतरला; IPL बंदीचा निर्णय कचऱ्याच्या पेटीत, एका रात्रीत नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.