IPL 2026: पहिल्याच सामन्यात अभिषेक-ट्रॅव्हिसची जोडी फ्लॉप; RCB च्या नव्या गोलंदाजाचा धुमाकूळ!

इंडियन प्रीमियर लीगच्या 19 व्या (Indian premiere league) हंगामाचा (IPL 2026) आज दिमाखात शुभारंभ झाला. हंगामाच्या पहिल्याच सामन्यात गतविजेता संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर हाय-व्होल्टेज लढत पाहायला मिळत आहे. नाणेफेक जिंकून आरसीबीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि हैदराबादला फलंदाजीचे आमंत्रण दिले.

गेल्या हंगामात आपल्या स्फोटक फलंदाजीने प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या नाकी नऊ आणणारी अभिषेक शर्मा (Abhishek Sharma and Travis Head) आणि ट्रॅव्हिस हेड ही जोडी यावेळेस स्वस्त्यात माघारी परतली. चाहत्यांना या ‘खतरनाक’ जोडीकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती, परंतु बेंगळुरूच्या गोलंदाजांनी त्यांना फार काळ खेळपट्टीवर टिकू दिले नाही.

आरसीबीचा नवा वेगवान गोलंदाज जॅकब डफी (Jacob Duffy) याने आपल्या आयपीएल कारकिर्दीची धमाकेदार सुरुवात केली आहे. डफीने आपल्या अचूक टप्प्यावर आणि वेगावर हैदराबादच्या दोन्ही सलामीवीरांना चकवले. त्याने अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांसारखे मोठे बळी मिळवून हैदराबादला सुरुवातीलाच बॅकफूटवर ढकलले. डफीच्या या कामगिरीमुळे चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

सलामीवीर लवकर बाद झाल्यामुळे सनरायझर्स हैदराबादच्या मधल्या फळीवर आता मोठी जबाबदारी आली आहे. सुरुवातीच्या धक्क्यातून सावरून हैदराबादचा संघ सन्मानजनक धावसंख्या उभारणार की आरसीबीचे गोलंदाज आपला दबदबा कायम राखणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.