IPL 2026: प्लेऑफमध्ये 'या' चार संघांची एन्ट्री होणार; स्पर्धेच्या सुरुवातीलाच प्लेऑफबाबत मोठी भविष्यवाणी

आयपीएल 2026 चा धमाका 28 मार्चपासून सुरू झाला असून, सलामीची लढत गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात सुरू आहे. या स्पर्धेच्या सुरुवातीलाच माजी क्रिकेटपटू अंबाती रायडूने (Ambati Rayudu) या हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचू शकणाऱ्या चार संघांची नावे जाहीर केली आहेत.

‘ईएसपीएन क्रिकइन्फो’शी बोलताना रायडूने सांगितले की, त्याच्या मते आरसीबी, मुंबई इंडियन्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे चार संघ सेमीफायनलचे तिकीट मिळवू शकतात. विशेष म्हणजे, आरसीबीने गेल्या हंगामात तब्बल 18 वर्षांची प्रतीक्षा संपवून आयपीएल 2025 चे जेतेपद पटकावले होते. आता रजत पाटीदारच्या (Rajat Patidar under captaincy) नेतृत्वाखाली हा संघ आपल्या विजेतेपदाचा बचाव करण्यासाठी मैदानात उतरेल.

दुसरीकडे, मुंबई इंडियन्सने (MI) गेल्या हंगामात दुसऱ्या क्वालिफायरपर्यंत मजल मारली होती. हार्दिक पांड्याच्या (Hardik pandya) नेतृत्वाखाली मुंबईचा संघ यंदा अत्यंत प्रबळ दिसत आहे. मुंबईकडे रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रयान रिकेल्टन, क्विंटन डी कॉक, तिलक वर्मा आणि स्वतः हार्दिक पांड्यासारखे दिग्गज फलंदाज आहेत. तसेच लिलावात शेरफेन रदरफोर्डला खरेदी केल्यामुळे त्यांची फलंदाजी अधिक मजबूत झाली असून गोलंदाजीही संतुलित दिसत आहे.

तसेच ऋषभ पंतच्या (Rishbh pant) नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्समध्येही (LSG) स्टार खेळाडूंची कमतरता नाही. मिचेल मार्श आणि एडन मार्करम या जोडीने गेल्या हंगामात चमकदार कामगिरी केली होती, तर निकोलस पूरन एकहाती सामना फिरवू शकतो. यावेळी लखनऊची गोलंदाजीही धारदार वाटत आहे. दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सची (KKR) फलंदाजी यंदा जबरदस्त दिसत आहे. टिम सीफर्ट आणि फिन ॲलन यांनी नुकत्याच संपलेल्या टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये धुमाकूळ घातला होता. विशेषतः फिन ॲलनने अवघ्या 33 चेंडूंत शतक झळकावले होते.

केकेआरने कॅमरन ग्रीनवरही मोठी बोली लावली आहे, जो फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीने योगदान देऊ शकतो. मात्र, हर्षित राणा (Harshit Rana and Aakash deep) आणि आकाश दीप संघाबाहेर असल्याने केकेआरची गोलंदाजी थोडी कमकुवत वाटत आहे.

Comments are closed.