हेनरिक क्लासेन Out की Not Out? IPL च्या पहिल्याच सामन्यात राडा, थेट पंचाशी भिडला, Video

फिल सॉल्ट कॅच विवाद हेनरिक क्लासेन आरसीबी विरुद्ध एसआरएच पहिला आयपीएल सामना : आयपीएल 2026 हंगामाची दमदार सुरुवात आज शनिवार (28 मार्च) रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्याने झाली. बंगळुरू येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात हेनरिक क्लासेन (Heinrich Klaasen) याच्या विकेटने मोठा वाद निर्माण झाला.

अभिषेक-हेड जोडीचा फुसका बार

सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादच्या फलंदाजांना जेकब डफीच्या भेदक गोलंदाजीसमोर टिकाव धरणे कठीण जात आहे. 30 धावांच्या आत तीन विकेट पडल्या आहेत. अभिषेक शर्मा फक्त सात धावा काढू शकला. तर ट्रॅव्हिस हेड नऊ चेंडूंमध्ये 11  धावा करून तो बाद झाला. नितीश रेड्डीला पण काही खास कामगिरी करू शकला नाही.

हेनरिक क्लासेन नाबाद?

दरम्यान, क्लासेन आणि इशान किशन यांनी चौथ्या विकेटसाठी 97  धावांची भक्कम भागीदारी उभी केली होती. क्लासेन 22 चेंडूत 31 धावा करून चांगल्या लयीत दिसत होता. मात्र रोमारियो शेफर्ड याने त्याला बाद केले, आणि याच क्षणापासून वादाला सुरुवात झाली. क्लासेनचा कॅच सीमारेषेजवळ फिल सॉल्ट याने घेतल्याचा दावा करण्यात आला. मात्र रिप्ले पाहताना बाउंड्रीजवळील कुशन हलल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यामुळे अनेकांना हा चेंडू सीमारेषेला लागून षटकार गेला होता, असे वाटत होते. तरीही तिसऱ्या पंचांनी क्लासेनला बाद घोषित केले.

या निर्णयानंतर मैदानावर काही क्षण गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. क्लासेन स्वतःही या निर्णयावर नाराज दिसला आणि त्याने पंचांशी चर्चा केल्याचेही दिसून आले. प्रेक्षक आणि सोशल मीडियावर चाहत्यांनी तीव्र प्रतिक्रिया देत पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

काव्या मारनचा चेहरा पडला…

वाद आणखी वाढण्याचे कारण म्हणजे तिसऱ्या पंचांनी टॉप अँगलमधील रिप्ले मागितला होता, पण त्या वेळी तो उपलब्ध नव्हता. आश्चर्य म्हणजे, ब्रेकनंतर तोच अँगल दाखवण्यात आला, ज्यामुळे प्रसारण व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेदरम्यान काव्या मारन (Kavya Maran) हिच्या चेहऱ्यावरची निराशा कॅमेऱ्यात कैद झाली

हे ही वाचा –

RCB vs SRH IPL 2026 : क्रीडा विश्व स्तब्ध! संपूर्ण बंगळुरू मैदान 2 मिनिट शांत, खेळाडूंच्या डोळ्यात पाणी, IPL च्या पहिल्या सामन्यात नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.