ASI ला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

नवी दिल्ली :

सर्वोच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या (एएसआय) महासंचालकांना अवमान नोटीस बजावली आहे. न्यायालयाच्या आदेशाचे हेतुपुरस्सर उल्लंघन करण्यात आले आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने दिल्लीतील 173 ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धनाबाबत अहवाल मागवला होता, परंतु भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने वेळेवर प्रतिसाद दिला नाही. न्यायालयाने यावर कठोर भूमिका घेत ‘एएसआय’ला नोटीस जारी केली आहे. या नोटिशीला लवकरात लवकर उत्तर देण्याची सूचना न्यायालयाकडून करण्यात आली आहे.

…………………

Comments are closed.