रंगयात्रा – द डेथ ऑफ पोटिस
<<दुष्यंत पाटील>>
जुलमी राजसत्तेचा विरोधातला आवाज ग्रीक तत्त्वज्ञ सॉक्रेटिसमधून प्रतिबिंबित झाला. प्रसिद्ध चित्रकार डेव्हिडच्या `द डेथ ऑफ पोटिस’ या चित्रातून उमटलेला प्रेंच क्रांतीचा रंग कलेच्या इतिहासात अजरामर झाला आहे.
फ्रान्सचा राजा सोळावा लुई याच्या कारकीर्दीत फ्रेंच जनतेवर खूप जुलूम झाले. 1770 आणि 1780 च्या दशकात त्याची सत्ता असताना जनतेनं `अनियंत्रित राजेशाही’ अनुभवली. फ्रान्समध्ये जुलुमी राजवट चालू असताना पॅरिसमध्ये चार्ल्स-लॉरेंट ट्रुडेन नावाचा एक श्रीमंत माणूस राहायचा. तो सुधारणावादी विचारसरणीचा होता. `नैतिकता’ आणि `त्याग’ दिसून येईल अशी एक कलाकृती त्याला हवी होती. त्या काळचा प्रसिद्ध चित्रकार डेव्हिड याला त्यानं हे कलाकृती बनवण्याचं काम दिलं. डेव्हिडनं रंगवलेलं चित्र कलेच्या इतिहासात अजरामर झालं. हे चित्र होतं `द डेथ ऑफ पोटिस’. जॅक-लुई डेव्हिड हा त्या काळातला फ्रान्सचा सर्वात मोठा चित्रकार होता. डेव्हिड हा फक्त चित्रकार नव्हता, तर तो फ्रेंच ाढांतीशी जोडलेला माणूस होता.
डेव्हिडनं `पोटिस’चाच विषय का निवडला? पोटिस हा ग्रीसचा एक महान विचारवंत होता. तो तरुणांना प्रश्न विचारायला शिकवायचा. तिथल्या सरकारला हे आवडलं नाही. त्यांनी त्याच्यावर तरुणांना बिघडवल्याचा आरोप ठेवला. त्याला दोन पर्याय दिले : `माफी माग’ किंवा `विष पिऊन मर’ पोटिसनं माफी मागण्यापेक्षा सत्यासाठी मरण्याचं स्वीकारलं. हे चित्र त्याच्या शेवटच्या क्षणाचं आहे. पोटिसनं मरताना म्हटलं होतं की, `कायद्यापेक्षा सत्य मोठं असतं.’ डेव्हिडला फ्रेंचांना हेच सांगायचं होतं की, ाढांती करायची असेल तर मरणाची भीती सोडून द्यावी लागते. चित्रात पोटिस ज्या धैर्यानं विषाचा प्याला घ्यायला सरसावलाय ते पाहून प्रेक्षकांमध्ये एक प्रकारचं `शौय’ संचारत होतं. `जर एक म्हातारा सत्यासाठी मरू शकतो, तर आपण आपल्या हक्कांसाठी का नाही?’ असा संदेश या चित्रामधून मिळत होता.
पोटिसला मारणारी सत्ता जशी चुकीची होती, तशीच फ्रान्सची सत्ताही `अन्यायी’ आहे हे डेव्हिडला या ऐतिहासिक उदाहरणातून दाखवायचं होतं. त्यानं थेट राजावर टीका केली असती तर त्याला जेल झाली असती. म्हणून त्यानं एका प्रकारे पोटिसचा प्रतीक म्हणून वापर केला. चित्राच्या अगदी मध्यभागी पोटिस एका हातानं विषाचा प्याला घ्यायला सरसावलाय, पण त्याचा दुसरा हात आकाशाकडे आहे. तो सांगतोय, `माझं शरीर मरेल, पण माझे विचार अमर आहेत.’
आजूबाजूला त्याच्या शिष्यांपैकी कोणी रडतंय, कोणी डोकं भिंतीवर टेकलंय, कोणी पोटिसच्या पायाला धरून रडतंय. त्यांचा `मानवी कमकुवतपणा’ आणि पोटिसचं `दैवी धैर्य’ यातला फरक चित्रकारानं भारी दाखवलाय. जो माणूस विषाचा प्याला पोटिसला देतोय, त्यानं स्वतचा चेहरा लपवलाय. पोटिसच्या पायाशी एक म्हातारा माणूस अत्यंत शांत बसलाय. तो आहे पोटिसचा लाडका शिष्य `प्लेटो’. खरं तर पोटिसच्या मृत्यूसमयी प्लेटो तरुण होता, पण चित्रकारानं त्याला म्हातारं दाखवलंय. कारण त्याला प्लेटोच्या विचारांची `प्रगल्भता’ दाखवायची होती.
डेव्हिड हा `निओ-क्लासिझम’ शैलीचा उस्ताद होता. या शैलीची वैशिष्टय़े `द डेथ ऑफ पोटिस’मध्ये दिसतात. चित्रात कुठेही धूसरपणा नाही. चित्र अतिशय सुस्पष्ट दिसतं. स्टेजवरच्या `स्पॉटलाईट’सारखा मुख्य प्रकाश पोटिसवर पडतोय. बाकीची खोली अंधारात आहे. जेव्हा 1787 मध्ये हे चित्र `पॅरिस सलून’मध्ये (त्या काळचे एक मोठे कला प्रदर्शन) मांडण्यात आले, तेव्हा लोकांच्या प्रतिािढया उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व होत्या. लोक हे चित्र तासन्तास बघत उभे राहायचे. हे चित्र लोकांमध्ये देशभक्तीची भावना चेतवत होतं. त्यांना पोटिसमध्ये स्वतचा संघर्ष दिसत होता. अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन तेव्हा फ्रान्समध्ये होते. त्यांनी हे चित्र पाहून उद्गार काढले की, “चित्र म्हणजे कलेच्या इतिहासातलं सर्वोत्तम काम आहे.” हे चित्र पाहायला आजही न्यूयॉर्कमधल्या कलासंग्रहालयात लोक गर्दी करतात!
Comments are closed.