साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 29 मार्च 2026 ते शनिवार 4 एप्रिल 2026
>> नीलिमा प्रधान
मेष – कामाचा व्याप राहील
मेषेच्या व्ययेषात मंगळ, चंद्र बुध प्रतियुती. संयम, सहनशिलता ठेवा तरच यश प्राप्त होईल. नोकरी टिकवा. कामाचा व्याप राहील. धंद्यात टिकून रहा. कायदा मोडू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ रहा. प्रतिष्ठा जपा. शुभ दि. 31, 3
वृषभ – नवी संधी मिळेल
वृषभेच्या एकादशात मंगळ, चुद्र, शुक्र त्रिकोणयोग. कल्पकता वाढेल. तुमच्या क्षेत्रात नवी संधी मिळेल. नोकरीत लाभ होईल. नवे काम मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकार प्राप्ती होईल. चर्चा घडेल. स्पर्धेत यश मिळेल. शुभ दि. 1, 2
मिथुन – प्रकृतीत सुधारणा होईल
मिथुनेच्या दशमेशात मंगळ, सूर्य चंद्र त्रिकोणयोग. कठीण कामे पूर्ण करता येतील. प्रकृतीत सुधारणा होईल. नवीन परिचय फायदेशीर ठरेल. नोकरीधंद्यात जम बसेल. कर्जाचे काम करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजनांना गती मिळेल. शुभ दि. 30, 3
कर्क – प्रयत्नांनी यश मिळेल
कर्केच्या नवमेषात मंगळ, चंद्र शुक्र त्रिकोणयोग. गोड बोलून राग न वाढवता स्वतची कामे करा. प्रयत्नांनी यश मिळवावे लागेल. धंद्यात, नोकरीत प्रभाव वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वैर वाढवू नका. कायद्याच्या चौकटीत रहा. शुभ दि. 30, 31
सिंह – रागावर नियंत्रण ठेवा
सिंहेच्या अष्टमेशात मंगळ, चंद्र बुध प्रतियुती. अहंकार नको. रागावर नियंत्रण ठेवा. वाहन जपून चालवा. प्रकृतीची काळजी घ्या. धंद्यात फसगत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारस्थाने वाढतील. मनावर दडपण येईल. शुभ दि. 31, 2
कन्या – धंद्यात चातुर्याने बोला
कन्येच्या सप्तमेशात मंगळ, चंद्र शुक्र त्रिकोणयोग. सप्ताहाच्या सुरुवातीला तडजोड स्वीकारावी लागेल. कठोर बोलणे नुकसानकारक. धंद्यात चातुर्याने बोला. नोकरीत धावपळ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्वतच्या योजना पूर्ण करा. शुभ दि. 3, 4
तूळ – कायदा मोडू नका
तुळेच्या षष्ठेशात मंगळ, चंद्र गुरू लाभयोग. क्षुल्लक अडचणी येतील. अहंकार, संताप न करता कामे करा तरच यश मिळेल. कायदा मोडू नका. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. धंद्यात नम्र रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता सांभाळा. शुभ दि. 29, 30
वृश्चिक – महत्त्वाची कामे करा
वृश्चिकेच्या पंचमेशात मंगळ, चंद्र शुक्र त्रिकोणयोग. महत्त्वाची कामे, चर्चा सुरुवातीलाच करा. यश मिळवा. विरोधकांना कमी लेखू नका. नोकरीधंद्यात नवा पर्याय शोधता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोठा निर्णय घ्यावा लागेल. शुभ दि. 30, 2
धनु – नवीन परिचय उत्साहवर्धक आहे
धनुच्या सुखेषात मंगळ, बुध गुरू त्रिकोणयोग. आरोपांना दुर्लक्षित करून यश मिळवण्याकडे लक्ष द्या. आत्मविश्वास वाढेल. परिचय उत्साहवर्धक ठरेल. नोकरीधंद्यात जम बसवा. राजकीय, सामाजिक क्षेत्राती कामे रेंगाळत ठेवू नका. शुभ दि. 30, 2
मकर – निर्णयात सावध रहा
मकरेच्या पराक्रमात मंगळ, बुध मंगळ युती. धाडसी निर्णय घेताना गुप्तता राखा. नोकरीत प्रभाव वाढेल. कामाचे कौतुक होईल. प्रतिष्ठा वाढेल. धंद्यातील गुंता सोडवा. कायदा मोडू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक मैत्री करतील. शुभ दि. 1, 2
कुंभ – अनाठायी खर्च टाळा
कुंभेच्या धनेषात मंगळ, चंद्र गुरू लाभयोग. सप्ताहाच्या मध्यावर अडचणी येतील. अनाठायी खर्च टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रेरणादायक वातावरण राहील. नोकरीधंद्यात महत्त्वाचा निर्णय घ्याल. नवे कंत्राट मिळेल. शुभ दि. 25, 26
मीन – अहंकार दूर ठेवा
स्वराशीत मंगळ, बुध गुरू त्रिकोणयोग. तत्परता ठेवा. रागावर नियंत्रण ठेवा. अहंकार, उतावळेपणा यावर संयम ठेवा. नोकरीत काम वाढेल. वर्चस्व टिकवता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ भूमिका घ्या. अभ्यासपूर्ण भाष्य प्रभावी ठरेल. शुभ दि. 1, 2
Comments are closed.