तरुणाला निर्जनस्थळी नेलं, गुप्तांगावर वार करुन रस्त्यावर फेकून दिलं, छ. संभाजीनगर हादरलं!

छत्रपती संभाजीनगर गुन्हा: छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) शनिवारी रात्री घडलेल्या एका अत्यंत क्रूर हल्ल्याच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गंगापूर–लासूर मार्गावरील शिंदेवाडी फाटा परिसरात 32 वर्षीय सीताराम आसाराम आळंजकर या तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात सीताराम गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या गुप्तांगावर वार केल्याची माहिती समोर येत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शिंदेवाडी फाट्याजवळील एका शाळेजवळ सीताराम उभे असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना जबरदस्तीने पकडले. त्यानंतर रस्त्यालगतच्या एका निर्जन शेतात नेऊन त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी त्यांच्या गुप्तांगावर वार करत गंभीर जखमा केल्या. या प्रकारानंतर आरोपींनी जखमी अवस्थेतच सीताराम यांना पुन्हा रस्त्यावर आणून सोडले आणि घटनास्थळावरून पळ काढला.

Chhatrapati Sambhajinagar Crime: तरुणाची प्रकृती गंभीर

या घटनेनंतर सीताराम बराच वेळ घटनास्थळी विव्हळत पडून होते. त्यांच्या अवस्थेची माहिती मिळताच त्यांचे चुलत भाऊ लक्ष्मण आळंजकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सीताराम यांना तातडीने गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime: परिसरात भीतीचे वातावरण

या घटनेमुळे शिंदेवाडी फाटा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा नोंदविण्यात आलेला नव्हता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या क्रूर हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

Chhatrapati Sambhajinagar News: पेट्रोल मिळत नसल्याने दुचाकी पेटवली, संभाजीनगरमधील घटना

दरम्यान, इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेल टंचाई निर्माण झाल्याच्या अफवेने एका तरुणाने चक्क आपली मोटारसायकल भररस्त्यात पेटवून दिली. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड-कन्नड रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार घडला. शरद गणपत भोजने असे या तरुणाचे नाव आहे. तो दारूच्या नशेत असल्याची माहिती आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. शरद याने दारूच्या नशेत हा प्रकार केल्याची माहिती असून सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आणखी वाचा

Ashok Kharat Nashik Crime News: ‘तू दिसायला सुंदर, नवऱ्याला तुझी कॅपॅबिलिटी ओळखता येत नाही’; माईंड रिडिंगमध्ये तरबेज असणारा अशोक खरात महिलांना कसं भुलवायचा, चौकशीत धक्कादायक माहिती उघड

आणखी वाचा

Comments are closed.