नागराज मंजुळे दिग्दर्शित मटका किंगचा टीजर प्रदर्शित, या तारखेला रिलीज होणार वेबसीरीज

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

फँड्री, सैराट आणि झुंड या चित्रपटांनंतर नागराज मंजुळे यांची मटका किंग ही नवीन वेबसीरीज प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या सीरीजमध्ये विजय वर्मा आणि कृतिका कामरा यांची मुख्य भूमिका आहे.

मुंबईतला सुप्रिसुद्ध मटका किंग रतन खत्रीच्या आयुष्यावर आधारित ही सीरीज आहे असे सांगितले जात आहे. मटका खेळून ब्रिज भट्टी कसा श्रीमंत होतो आणि आपले साम्राज्य उभं करतो अशी या सीरीजची कथा आहे. विजय वर्मासोबत सई ताम्हणकर, भूपेंद्र जडावत, सिद्धार्थ जाधव, गुलशन ग्रोव्हर, भरत जाधव, गिरीश कुलकर्णी, जेमी लीव्हर, किशोर कदम, सायरस साहुकार, अर्पिता सेठिया, संभाजी तांगडे, इश्तियाक खान, संजीव जोतांगिया, सिमरन अश्विनी अशी तगडी स्टारकास्टही या सीरीजमध्ये आहे. या सीरीजचा टीझर प्रदर्शित झाला असून 17 एप्रिल रोजी ही सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Comments are closed.