डिजीटल अरेस्टच्या नावाने नांदेडच्या चार तरुणांनी मुंबईतील तरुणीला 32 लाखाला गंडवले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

डिजीटल अरेस्ट असा कोणताही प्रकार नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात येत असले तरी याचा फटका मुंबईच्या एका तरुणीला बसला असून, नांदेडच्या तरुणीला डिजीटल अरेस्टच्या नावाखाली या तरुणीला 32 लाखाला गंडवले. मुंबईच्या पथकाने यातील चार आरोपींचा शोध लावला असून त्यांना नांदेडच्या इतवारा पोलिसांच्या मदतीने अटक करुन त्यांना मुंबईला तपासासाठी घेवून गेले आहेत.

मुंबईतील गोरेगाव पूर्व येथे राहणार्‍या 21 वर्षीय तरुणीला व्हॅटसअ‍ॅप व्हिडीओ कॉल करुन आम्ही चेन्नई पोलीस दलातील सबइन्स्पेक्टर अरुणकुमार बोलत असल्याचे सांगून मुंबई पोलिसांनी पहेलगाम हल्यातील दहशतवादी अफजल खानला अटक केली. त्यांच्याकडे तुमच्या आजीच्या नावाचे सिमकार्ड सापडले आहे. या सिमकार्डवरुन देशाची गोपनिय माहिती शत्रु राष्ट्राला पुरविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सदरीला घराबाहेर पडू न देता तुमची डिजीटल अरेस्ट झाली आहे. तपासणीच्या नावाखाली बँक खाते व त्यांचे डिटेल पाठविण्याचे सांगण्यात आले. या आरोपींनी फिर्यादीकडून टप्प्याटप्प्याने ३२ लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे. सदरच्या तरुणीला बनावट एफआयआर, अटक वॉरंट आणि इम्युनिटी सर्टीफिकेट देखील पाठविले होते. हा प्रकार फेब्रुवारी महिन्यात घडला होता. सदर तरुणीचे वडील जर्मनीत होते. जर्मनीतून परत येताच त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. मुंबई पोलिसांनी या सर्व तपासात तांत्रिक बाबी आधारे सदरचे तरुण नांदेडचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यात निलेश वासमवार (25) रा.साईनगर सिडको, शुभंम जोगदंड (25) रा.शक्तीनगर इतवारा, अजय भोसले रा.लोहारगल्ली इतवारा आणि सिध्दांत जोंधळे रा.शक्तीनगर इतवारा या आरोपीचा समावेश होता. या चौघांनी अन्य काही गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, काल रात्री इतवारा पोलीस ठाण्यात त्याची नोंद करुन त्यांना इतवारा पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली आहे.

Comments are closed.