आयपीएल 2026: केकेआरविरुद्धचा रेकॉर्ड पाहता 14 वर्षाचा 'हा' इतिहास बदलण्याची संधी मुंबई इंडियन्सकडे
आयपीएल २०२६ च्या हंगामातील दुसरा सामना आज (रविवार, २९ मार्च) मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) असा रंगणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. घरच्या मैदानावर मुंबईला १४ वर्षाचा इतिहास बदलण्याची संधी आहे. तसेच या सामन्यामध्ये यावर्षी टी२० मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूचा जलवा दिसणार आहे.
घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्स एक बलाढ्य संघ आहे, त्यांनी ९२ सामन्यांत ५७ विजय मिळवले आहेत. मात्र सलामीच्या सामन्यात मुंबईची कामगिरी चांगली नाही, त्यांनी चार सामने गमावले आहेत.
मुंबई इंडियन्सने सलग १३ हंगामांमध्ये आणि एकूण १८ हंगामांपैकी १४ हंगामांमध्ये आपला सलामीचा सामना गमावला आहे मुंबईने आयपीएलचा पहिला सामना शेवटी २०१२ मध्ये जिंकला आहे. त्यानंतर झालेल्या सर्व हंगामांमध्ये मुंबईने पहिला सामना गमावला आहे. यामुळे पाच वेळेचा विजेत्या मुंबईला हा १४ वर्षांचा दुष्काळ संपवण्याची संधी आहे. तसेच केकेआर विरुद्ध मुंबईचा रेकॉर्ड उत्तम आहे. संघाने ३५ पैकी २४ सामने जिंकले आहेत.
केकेआरने मुंबईविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर १२ पैकी केवळ दोनच सामने जिंकले आहेत. पहिला सामना २०१२ आणि दुसरा सामना २०२४ मध्ये, मात्र केकेआरने आज चांगला खेळ केला तर मुंबईसाठी कठीण होईल.
तसेच मुंबईसाठी जसप्रीत बुमराह निवडीसाठी उपलब्ध आहे. त्याच्या प्रभावी गोलंदाजीने तो संघाचा प्रमुख गोलंदाज आहे.
Comments are closed.