इंदापूर येथील अजित पवार गटाच्या कार्यक्रमातील बॅनरवरून सुनेत्रा पवार, अजित पवारांसह पक्ष श्रेष्टींचे फोटो बेपत्ता
माणगाव तालुक्यातील इंदापूर येथे अजित पवार गटाच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांचा सत्कार सोहोळा कार्यक्रम पार पडला. या कार्यालयातील बॅनरवरून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व सुनेत्रा पवार यांच्यासह पक्ष श्रेष्ठीचे फोटो बेपत्ता असल्याचे पहावयास मिळाले.
राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदार संघांतील इंदापुर येथे नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपिठावरील बॅनरवर खासदार सुनिल तटकरे, मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह स्थानिक नेत्यांचे फोटो लावण्यात आले होते. मात्र या बॅनरवर दिवंगत नेते अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पक्षश्रेष्टींचे फोटो लावण्यात आले नाहीत. या कार्यक्रमाला स्वतः सुनील तटकरे उपस्थित होते. चक्क अजित पवार गटाच्या नेत्यांचेच फोटो गायब असल्याने तालुक्यात एकच चर्चा रंगली आहे.
Comments are closed.