इराणचा अमेरिकेला मोठा दणका; सौदीतील तळावर क्षेपणास्त्र हल्ला, अब्जावधींचे E-3 Sentry विमान उद्ध्वस्त
इराणने सौदी अरेबियातील एका प्रमुख अमेरिकन लष्करी तळावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला केला असून, यामध्ये अमेरिकेचे अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे E-3 Sentry AWACS (Airborne Warning and Control System) विमान उद्ध्वस्त झाले आहे. या विमानाला अमेरिकन हवाई दलाचे हवेतील डोळे म्हटले जाते, त्यामुळे हा अमेरिकेसाठी मोठा लष्करी धक्का मानला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इराणने सौदी अरेबियातील प्रिन्स सुल्तान एअरबेसवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला. इराणच्या या हल्ल्याचा मुख्य निशाणा अमेरिकेची पाळत ठेवणारी यंत्रणा आणि हवाई संरक्षण यंत्रणा होती. या हल्ल्यात E-3 Sentry या विमानाला थेट फटका बसला. हे विमान शत्रूची विमाने, क्षेपणास्त्रे आणि जहाजांचा लांबूनच मागोवा घेण्यास सक्षम आहे. या विमानाचे नुकसान झाल्यामुळे या भागात अमेरिकेची हवाई देखरेख करण्याची क्षमता तात्पुरती कमकुवत झाली आहे.
लष्करी तज्ज्ञांच्या मते, AWACS विमान हे केवळ विमान नसून ते हवेतील एक फिरते नियंत्रण केंद्र आहे. एका विमानाची किंमत अब्जावधी रुपये आहे असून ते तयार करण्यासाठी अनेक वर्षे लागतात. इराणने या विमानाला लक्ष्य करून अमेरिकेच्या युद्धनीतीलाच आव्हान दिले आहे. या हल्ल्यानंतर अमेरिकन संरक्षण मुख्यालय पेंटागनमध्ये खळबळ माजली असून, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देण्याचे संकेत दिले आहेत.
Comments are closed.