प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून मृत्यू, शूटिंगदरम्यान घडली दुर्घटना

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

प्रसिद्ध बंगाली अभिनेता राहुल अरुणोदय बॅनर्जी याचा पश्चिम बंगालमधील दिघा येथे समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ही भीषण दुर्घटना घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण बंगाली चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

राहुल बॅनर्जी सध्या लोकप्रिय बंगाली मालिका ‘भोले बाबा पार करेगा’ मध्ये मुख्य भूमिका साकारत होता. यासाठी संपूर्ण शूटिंग युनिट दिघाजवळील तळसरी येथे आले होते. समोर आलेल्या माहितीनुसार, शूटिंग संपल्यानंतर राहुल मालिकेतील मुख्य अभिनेत्रीसोबत समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेला. याचवेळी तो पाण्यात पोहोण्यासाठी गेला असता बुडू लागला. सेटवरील सहकाऱ्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु लाटांचा जोर इतका होता की, तो क्षणार्धात दिसेनासा झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन दलाने तातडीने शोधमोहीम हाती घेतली. काही तासांच्या प्रयत्नांनंतर राहुल याचा मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आला. ूबोतो तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Comments are closed.