ज्याला संपला समजले, त्यानेच मुंबईचं मैदान गाजवलं! 5 षटकार, 3 चौकार अन् 67 धावा, अजिंक्यचा धमाका
अजिंक्य रहाणे एमआय वि केकेआर आयपीएल 2026 : आयपीएल 2026 (IPL 2026) मधील या सामन्यात कोलकाता नाइट राइडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा अक्षरशः धुव्वा उडवला. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने तुफानी अर्धशतक झळकावत जोरदार खळबळ उडवली. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या या सामन्यात डावाची सुरुवात करताना रहाणेने अवघ्या 27 चेंडूत फिफ्टी पूर्ण केली. या अर्धशतकासाठी त्याने 4 षटकार आणि 3 चौकारांची आतषबाजी केली. अखेरीस तो 40 चेंडूत 67 धावा करून बाद झाला. त्याच्या या शानदार खेळीत 5 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता.
खूब भलो, रहाणे! 💜🙌
समोरून नेतृत्व करत, डावाला अँकरिंग – @ajinkyarahane88 वानखेडे येथे उत्कृष्ट अर्धशतक आणतो 💥कर्णधार याला मोठ्या प्रमाणात बदलून केकेआरला कमांडिंग टोटलवर नेऊ शकतो का? 👀#TATA आयपीएल 2026 | #MIvsKKR | आता थेट 👉 https://t.co/CpylVZNa3Z pic.twitter.com/LKGl3wDSXZ
— स्टार स्पोर्ट्स (@StarSportsIndia) 29 मार्च 2026
ज्याला संपला समजले, त्यानेच मुंबईचं मैदान गाजवलं!
या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि केकेआरला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. केकेआरकडून अजिंक्य रहाणे आणि फिन ऍलन यांनी डावाची सुरुवात केली. दोघांनी मिळून अवघ्या चौथ्याच षटकात संघाचा स्कोअर 50 धावांच्या पुढे नेला. न्यूझीलंडचा युवा फलंदाज फिन ऍलन, जो केकेआरसाठी पहिल्यांदाच आयपीएल खेळत आहे, त्याने रहाणेला उत्तम साथ दिली. ऍलनने 17 चेंडूत 37 धावांची झंझावाती खेळी केली, ज्यात 6 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी फक्त 32 चेंडूत 69 धावांची भागीदारी रचली.
पांड्याचा कर्दनकाळ बनून आलेल्या अजिंक्यचा धमाका!
या डावात रहाणे आणि ऍलन यांनी मिळून हार्दिक पांड्याच्या एका षटकात तब्बल 26 धावा काढल्या. त्या षटकात 3 चौकार, 2 षटकार, एक सिंगल आणि एक वाइडचा समावेश होता. त्यामुळे हा हार्दिक पांड्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वात महागडा षटक ठरला.
कर्णधार अजिंक्य रहाणे आणि फिन ऍलन यांनी चौथ्या षटकात २६ धावा केल्या 🔥
त्यांच्या धडाकेबाज फलंदाजीला पुन्हा जिवंत करा ▶️ https://t.co/tUEZmNx4Gr#TATAIPL | #खेलबिंदास | #MIvKKR | @KKRiders pic.twitter.com/FHVe62CUae
— इंडियन प्रीमियर लीग (@IPL) 29 मार्च 2026
आयपीएल 2026 मध्ये दोन्ही संघ विजयाने सुरुवात करण्याच्या इराद्याने मैदानात उतरले आहेत. मात्र, मुंबई इंडियन्सचा पहिला सामना जिंकण्याचा विक्रम फारसा चांगला नाही. 2012 नंतर मुंबईला हंगामातील पहिला सामना जिंकता आलेला नाही. दुसरीकडे, मागील हंगाम विसरून केकेआर संघ दमदार विजयाने मोहीम सुरू करण्यासाठी सज्ज आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.