आयपीएल 2026 चे संपूर्ण समीकरण! कोणत्या गटात कोणता संघ? जाणून घ्या CSK vs RCB सामना एकदाच का होणार

आयपीएल 2026 (IPL 2026) ची सुरुवात 28 मार्चपासून झाली आहे. जेव्हापासून आयपीएलमध्ये दोन नवीन संघ सामील झाले आहेत, तेव्हापासून प्रत्येक हंगामात दोन वेगवेगळे गट (Groups) पाडले जातात. प्रत्येक गटात एकूण 5 संघ असतात. ‘कोणता संघ कोणत्या गटात आहे?’ असा प्रश्न सर्वांच्या मनात होता, कारण बीसीसीआयने (BCCI) याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नव्हती. मात्र, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यादरम्यान दोन्ही गटांचा खुलासा झाला आहे.

गट अ (Group A)
चेन्नई सुपर किंग्स (CSK)
कोलकाता नाईट रायडर्स (KKR)
राजस्थान रॉयल्स (RR)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)
पंजाब किंग्स (PBKS)

गट ब (Group B)
मुंबई इंडियन्स (MI)
सनरायझर्स हैदराबाद (SRH)
गुजरात टायटन्स (GT)
दिल्ली कॅपिटल्स (DC)
लखनौ सुपर जायंट्स (LSG)

पूर्वी जेव्हा आयपीएलमध्ये 8 संघ असायचे, तेव्हा सर्व फ्रँचायझी एकमेकांविरुद्ध दोन-दोन सामने खेळायचे. त्यानुसार प्रत्येक संघाचे एकूण 14 सामने व्हायचे. आता 10 संघ झाल्यामुळे प्रत्येक फ्रँचायझीचे एकूण 18 सामने व्हायला हवे होते. मात्र, बीसीसीआयने (BCCI) सामन्यांची संख्या 14 वर मर्यादित ठेवण्यासाठी ‘ग्रुप सिस्टम’ (गट पद्धत) सुरू केली. या पद्धतीनुसार, प्रत्येक संघ आपल्याच गटातील इतर संघांशी फक्त एकदाच खेळतो, तर दुसऱ्या गटातील पाचही संघांशी त्यांचे दोन-दोन सामने होतात.

या नियमामुळे प्रत्येक संघ स्पर्धेत एकूण 14 सामने खेळतो.
आयपीएल 2026 चे संपूर्ण वेळापत्रक जेव्हा जाहीर झाले, तेव्हा CSK आणि RCB यांच्यात फक्त एकच सामना होणार असल्याचे पाहून चाहत्यांची मोठी निराशा झाली. हे दोन्ही आयपीएलमधील सर्वात मोठे संघ मानले जातात आणि त्यांना एकमेकांसमोर खेळताना पाहणे नेहमीच रंजक असते. यावेळेस CSK आणि RCB या दोन्ही संघांना ‘ग्रुप ए’ मध्ये ठेवण्यात आले आहे. नियमानुसार एकाच गटात असल्यामुळे ते लीग स्टेजमध्ये फक्त एकदाच एकमेकांसमोर येऊ शकतात.

Comments are closed.