IPL 2026 – 14 वर्षांचा वनवास संपला! मुंबई इंडियन्सने जिंकला सलामीचा सामना, रोहित-रिकल्टनची अर्धशतकीय खेळी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गेल्या 14 वर्षापासून सलामीचा सामना देवाला देण्याची परंपरा यंदा मुंबई इंडियन्सने मोडीत काढली आहे. रविवारी वानखेडे मैदानावर झालेल्या लढतीत मुंबईने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा 6 विकेट्सने पराभव केला. कोलकाताने विजयासाठी दिलेले 221 धावांचे आव्हान मुंबईने 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. सलामीवीर रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांनी अर्धशतकी खेळी करत मुंबईला विजयी सलामी दिली. रोहितने 78 आणि रिकल्टनने 81 धावा चोपल्या. मुंबईकडून 3 विकेट्स घेणाऱ्या शार्दुल ठाकूर याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने वीस षटकांमध्ये 4 बाद 220 धावा केल्या. कर्णधार अजिंक्य रहाणे याने 67, अंगक्रिश रघुवंशी याने 51 धावांची खेळी केली. तर फिन ऍलन याने 37 आणि रिंकू सिंह याने 33 धावांचे योगदान दिले.

Comments are closed.