महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा दीक्षान्त सोहळा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईतील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा (एमएनएलयू) चौथा दीक्षान्त सोहळा शनिवारी पार पडला. विधी शिक्षणातील शैक्षणिक प्रवास पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्याचा हा संस्मरणीय क्षण ठरला.

विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमातील 255 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, एल.एल.एम.ए मेडिएशन आणि एमबीए या अभ्यासक्रमाचा समावेश होता. तसेच बीए एलएलबी (ऑनर्स) या अभ्यासक्रमातील 199 विद्यार्थ्यांचा समावेश होता. या सोहळय़ाला एमएनएलयू मुंबईचे कुलगुरू प्रा. दिलीप उके, कुलपती न्यायमूर्ती आलोक अराधे, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे, न्यायमूर्ती संदीप मारणे, महाराष्ट्र राज्याचे अधिवक्ता डॉ. मिलिंद साठे, इंडिया युनिव्हर्सिटी ऑफ लीगल एज्युकेशन अॅण्ड रिसर्चचे (गोवा) कुलगुरू प्रा. वेंकट राव. प्रा. प्रविणा खोब्रागडे, एमएनएलयूचे कुलसचिव प्रा. प्रकाश चौधरी उपस्थित होते.

Comments are closed.